आरमोरी: आरमोरी येथे माझं कुंकू माझा देश उपक्रमा अंतर्गत ठाकरे सेना महिला आघाडीचा वतीने निषेध आंदोलन
पक्षाचा वतीने सूरू माझं कुंकू माझा देश " या मोहीमे अंतर्गत पहलगाम भ्याड आतंकवादी हल्ल्याला जबाबदार पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या दुटप्पी केंद्र सरकार विरोधात शिवसेना (उद्धव ठाकरे गटाचा) महिला आघाडी आरमोरीच्या वतीने आरमोरी येथील इंदिरा गांधी चौकात दि.१४ सप्टेबंर रविवार रोजी सांयकाळी ५ वाजता आंदोलन करण्यात आले. यावेळी " या सरकारचा करायच काय -खाली डोके वरती पाय" अशा घोषणा देत केंद्र शाशनाचा विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.