लाखनी येथील स्वागत लॉन परिसरातील एका खाजगी जागेत शिरून कुंपण तोडल्याच्या वादातून फिर्यादी व त्यांच्या भावाला बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने लाखनी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हिमांशु अनिल खेडीकर (४२) यांच्या मालकीच्या जागेत आरोपी रोहित किशोर खेडीकर (४९), किशोर रामकृष्ण खेडीकर (७५), लता किशोर खेडीकर (७०) आणि अखिल किशोर खेडीकर (४४) यांनी अनाधिकृतपणे प्रवेश केला.