मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द बसस्थानकावर महसूल विभागाने शनिवारी रात्री १:३० वाजेच्या सुमारास रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली. नायब तहसीलदार विमल थोटे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात नेले. तलाठी हिमांशु साखरे, अक्षया फुलेकर, कार्तिक सिरसकार, विकासा कदम, महसूल सेवक चंद्रकुमार नंदनवार व शिपाई शिशुपाल मदनकर यांच्या गस्ती पथकाला एक ब्रास रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर आढळला चौकशीत कोणताही परवाना नसल्याचे उघड झाले.