खेड: बेकायदा कब्जाप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल, केळगाव येथील घटना
Khed, Pune | Oct 21, 2025 केळगाव येथील खासगी जमिनीमध्ये घुसून सिमेंटच्या खांबांचे कुंपण करून अतिक्रमण करत जमिनीवर बेकायदा कब्जा केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली.चेतन चरवळ विजय पाटील (रा. हडपसर), सुनील व मुकुंद (रा. केळगाव, हरी ओम संस्था) आणि इतर अनोळखी व्यक्तींवर आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.