गोंदिया: धान विक्रीसाठी नोंदणीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ,शेतकऱ्यांना दिलाशा, 1लाख 14 हजार 352 शेतकऱ्यांनी केली नोंदणी
खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना भीम पोर्टल ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे.पण नोंदीची मुदत 15 डिसेंबरला संपल्याने, अनेक शेतकरी नोदंणीपासुन वंचित होते. त्यामुळे शेतकऱ्यांना बोनस आणि हमीभाव मिळण्यासाठी वंचित राहण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र शासनाने 17 डिसेंबरला नोंदनीसाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत वाढीचे पत्र काढल्याने हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अशी माहिती दि.18 डिसेंबरला 3 वा.देण्यात आली आहे.