जालना जिल्हा नोटरी असोसिएशनचे कार्याध्यक्ष ड. महेश एस. धनावत यांनी राज्यातील वाढत्या शासकीय भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी एक महत्त्वपूर्ण मागणी मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. रविवार दि. 9 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकार्यांमार्फत सादर करण्यात आलेल्या निवेदनातून त्यांनी भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांचा समावेश महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) 1999 मध्ये करण्याची मागणी केली आहे.या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.