उदगीर: गुडसुर येथे गोवंशाची कत्तल करणाऱ्या दोघांना वाढवणा पोलिसांनी घेतले ताब्यात,आरोपीकडून धारधार हत्यार जप्त
Udgir, Latur | Oct 28, 2025 उदगीर तालुक्यातील गुडसुर येथे गोवंशाची कत्तल करीत असल्याची गुप्त माहिती २८ ऑक्टोबर रोजी पहाटे साडे चार वाजेच्या दरम्यान वाढवणा पोलिसांना मिळाली,वाढवणा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हलसे,पोलीस नाईक पुल्लेवाड,पोलीस हवालदार मधुकर कार्लेवाड,पोलीस मित्र उत्तम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता गोवंशाची कत्तल केल्याचे आढळून आले,घटनास्थळावरून कत्तलीसाठी वापरण्यात आलेले हत्यार व गोवंशाचे मास जप्त करण्यात आले असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.