वाशिम: नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध पक्षांची नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी यांनी घेतली बैठक
Washim, Washim | Nov 7, 2025 वाशिम दि. ७ नोव्हेंबर (जिमाका) निवडणुका ह्या लोकशाहीचा प्रमुख केंद्रबिंदू असून नि:पक्ष आणि मुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात राजे वाकाटक सभागृहात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक आज दि.७ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती.