बुलढाणा: परिवहन विभागाकडून दोनचाकी वाहनधारकांसाठी नवीन नोंदणी मालिकेचा शुभारंभ
बुलढाणा परिवहन विभागाकडून दोनचाकी वाहनांच्या MH-28 CE या नवीन नोंदणी मालिकेचा 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता शुभारंभ करण्यात आला आहे.पसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याची सुरवात करण्यात आली असून निर्धारित शुल्कासह उपलब्ध करण्यात आले आहे.या नव्या मालिकेमुळे वाहनधारकांना नोंदणी प्रक्रियेत अधिक सुलभता मिळणार असून, जिल्ह्यातील वाढत्या वाहनसंख्येच्या पार्श्वभूमीवर ही मालिका सुरू करण्यात आली आहे.असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.