कोरची: कोरची आश्रय शाळेत गोंडवानाची विरांगना राणी दुर्गावती जयंती उत्साहात साजरी
शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोरची येथील बहुउद्देशीय सभागृहात गोंडवाना राज्याची आदिवासी विरांगना राणी दुर्गावती यांची जयंती आज ५ आक्टोंबर रविवार रोजी दूपारी १२ वाजता साजरी करण्यात आली. भारताच्या इतिहासातील शूर विरांगणा राणी दुर्गावती यांचा शौर्य, पराक्रम व बलिदानाने निर्माण केलेला गौरवशाली इतिहास आदिवासी समाजाला व विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आहे यासाठी राणी दुर्गावती यांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.