बेपत्ता असलेल्या इसमाचा खून झाल्याचे उघडकीस आले असून, बुटीबोरी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक केली आहे. मृतकाचे नाव वसंता रामाजी नेवारे वय 48 वर्ष असे सांगण्यात आले आहे तर अटकेतील आरोपी लोकेश उर्फ लंख्या हिरालाल धाबोर्डे (वय २८ वर्ष), हा आहे.वसंता नेवारे हे ९ जानेवारी रोजी कामावर गेले होते, परंतु ते घरी परतले नाहीत. नातेवाईकांनी शोध घेतला असता त्यांची दुचाकी सातगाव येथील एका दारू दुकानाजवळ सापडली.