शहादा: संविधान चौकात शहादा पोलिसांची मोठी कारवाई, ६९ लाख १२ हजारांचा विदेशी मद्य जप्त
शहादा पोलिसांनी संविधान चौक येथे कारवाई करून तब्बल ६९ लाख १२ हजार रुपयांचा बनावट परदेशी दारू साठा जप्त केला. या कारवाईत राजस्थानमधील सुरेश बिश्नोई (वय २३, रा. बाडमेर, राजस्थान) या ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आज शहादा-दोंडाईचा रोडवर अशोक लेलँड कंपनीचा ट्रक (क्रमांक. के ए ०९-ए बी-०४८४) ताब्यात घेण्यात आला.