भंडारा: आदर्श नगर लाखनी येथे नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी आमदार डॉ. फुके यांचा जनता दरबार संपन्न
नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी नियमित स्वरूपात जनता दरबार भरविण्यात येतो. याच पद्धतीने भंडारा जिल्ह्यातील आदर्श नगर लाखनी येथे दि. ६ जुलै रोजी सायं. ६ वा. दरम्यान आमदार डॉ. परिणय फुके यांच्या वतीने जनता दरबार भरविण्यात आला होता. यावेळी भंडारा शहरी आणि ग्रामीण तसेच आजूबाजूच्या भागांतून नागरिक भेटण्यासाठी आले होते. यावेळी आमदार डॉ. फुके यांनी भेटीसाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाला वेळ देऊन त्यांची समस्या जाणून घेतली.