माळशिरस: भारत पाकिस्तान सामन्यावरून शिवसेना युवा सेनेकडून आरसीसीचा निषेध : युवासेना उपसचिव रणजीत बागल
भारत पाकिस्तान सामन्यावरून शिवसेना युवा सेनेकडून आयसीसीचा निषेध करण्यात आला असून आयसीसीच्या प्रतिमेला काळे फासण्यात आल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे उपसचिव रणजीत बागल यांनी दिली आहे. आज रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ शेअर करत त्यांनी माहिती दिली आहे. दरम्यान, आजच्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ठाकरे गट शिवसेनेकडून सर्वत्र आंदोलन करण्यात येत आहे.