घाटंजी: तळणी येथे शुल्लक कारणातून दगडाने मारहाण,आरोपी विरुद्ध घाटंजी पोलिसात गुन्हे दाखल
फिर्यादी अर्जुन राठोड यांच्या तक्रारीनुसार दोन नोव्हेंबरला आरोपी रवींद्र जाधव व अरविंद जाधव यांनी फिर्यादीस गावातील लाईन बंद का केली या कारणावरून वाद केला व दगडाने फिर्यादीला व फिर्यादीच्या भावास मारहाण केली तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी 2 नोव्हेंबरला घाटंजी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.