नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ, हस्तीनापूर च्या सौजन्याने दिवाळीनंतर परंपरेनुसार मंडई मेला उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात ग्रामस्थ व विविध समाजघटकांनी सहभाग नोंदवत कार्यक्रमाला सुंदर, रंगतदार आणि सांस्कृतिक ओळख जपणारी शोभा प्राप्त झाली.कार्यक्रम मनोरंजक, सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा आणि परंपरेचा वारसा उजळविणारा ठरला. यावेळी बँक संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे,जि प सदस्य शैलेश नंदेश्वर, पि.के.बोपचे आदी उपस्थित होते.