लाखनी: ओबीसी समाजाविरोधात सरकारचे धोरण : आमदार नाना पटोले यांचा पञपरीषदेतुन आरोप
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “ही सरकार ओबीसी विरोधी आहे. ओबीसी समाजाने आता भाजपला धडा शिकवायलाच हवा,” असे ते म्हणाले. पटोले म्हणाले, “ही सरकार म्हणते आम्ही ओबीसींच्या पाठीशी आहोत, पण भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील पोलिस भरतीमध्ये ओबीसींना स्थान दिलं नाही. शिक्षणाचे अधिकार काढून घेत आहेत. ओबीसी समाजाला फसवण्याचे काम या सरकारने केलं आहे.”