भंडारा: भंडारा पोलीस दलाकडून ‘माझा रस्ता माझी जबाबदारी’ उपक्रमांतर्गत कारवाई
भंडारा जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत ‘माझा रस्ता माझी जबाबदारी’ या जनजागृती उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. अपघात विरहित प्रवास घडवून आणावा यासाठी हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत राबविण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाने विविध ठिकाणी वाहन तपासणी मोहीम हाती घेतली. या कारवाईदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.