जालना: 150 दिवस कार्यक्रमांतर्गत जिल्हा संकेतस्थळात आमूलाग्र बदल - सुगम भेट द्वारे जिल्हाधिकार्यांना होणार ऑनलाइन भेटता येणार
Jalna, Jalna | Sep 21, 2025 जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून 150 दिवस कार्यक्रमांतर्गत जालना जिल्ह्याच्या अधिकृत शासकीय संकेतस्थळात आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. हे संकेतस्थळ नागरिकाभिमुख, माहितीपूर्ण आणि सुलभ व्हावे यासाठी विविध सुधारणा करून आधुनिक स्वरूप देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने रविवार दि. 21 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता दिली. नव्या सुधारण्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,महसूल मंत्री, पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांची छायाचित्रे तसेच अधिकृत सोशल मीडिया सुरु केले.