शहरातील श्री बालाजी मंदिर संस्थान येथे धार्मिक उत्सव
माजलगाव शहरातील श्री बालाजी मंदिर संस्थान येथे शनिवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून भव्य धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात सकाळी विशेष पूजाअर्चा विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.या सोहळ्याला आमदार प्रकाश सोळंके यांनी भेट देऊन भगवान बालाजीचे दर्शन घेतले तसेच आयोजक आणि भक्तांशी संवाद साधला. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून समाजातील धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.