चिखलदरा तालुक्यातील बोदु गावात विकासाच्या नावावर केवळ दिखावा झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आपल्या व्यथा प्रसार माध्यमांसमोर आज दुपारी ४ वाजता मांडल्या.गावात मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे; मात्र नेटवर्क नाही. पाण्याची टाकी आहे, पण नळाला पाणी येत नाही. वीज खांब उभे आहेत;मात्र लाईट नाही. रस्ते आहेत, पण ते आजही कच्चे व खड्डेमय अवस्थेत आहेत. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन अत्यंत कठीण झाले आहे.