बार्शी: चार वासरांचा मृत्यू, ३४ जनावरांना वाचवले; हिंगणगाव फाट्याजवळ कारवाई- तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक ढेरे
Barshi, Solapur | Sep 30, 2025 बार्शी तालुका पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून कत्तलीसाठी नेली जात असलेल्या 34 जनावरांची सुटका केली. परंडा-बार्शी रोडवरील हिंगणगाव फाट्याजवळ पांढऱ्या रंगाच्या पिकअप व्हॅनची तपासणी केली असता जर्सी गाईंची वासरे व एक रेडकू आढळले. यापैकी चार वासरे मृत होती. पोलिसांनी पिकअपसह जनावरे ताब्यात घेतली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याची माहिती बार्शी तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी ३० रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दिली आहे.