हिंगोली: शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात डॉक्टरवर मोकाट जनावरांचा हल्ला
हिंगोली शहरातील डॉक्टर सुशील बोथरा हे आज दिनांक 3 नोव्हेंबर रोजी बाहेर गावाहून रेल्वेने हिंगोलीला पोहोचले होते त्यांना ऑटो मिळाला नसल्याने ते पायी चालत असताना यावेळी त्यांच्यावर मोकाट जनावराने हल्ला करून खाली पाडले यावेळी त्यांनी आरडाओरड सुरू केली रस्त्यावरून काही नागरिक जात असताना त्यांनी या जनावरांना हाकले व त्यांना तात्काळ शहरातील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आली आहे अशी माहिती सायंकाळी सहा वाजता प्राप्त झाली.