सुरगाणा: दांडीची बारी घाटात बस व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार तर एक गंभीर जखमी
Surgana, Nashik | Oct 21, 2025 तालुक्यातील दांडीचीबारी घाटात एका वळणावर बसने उजव्या बाजूने धक्का दिल्याने दुचाकी वरील एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत पोलीसात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत.