पिंपरी चिंचवड भागातून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. रस्त्याचे सपाटीकरणाचे काम करत असताना रोड रोलरखाली चिरडून एका सहाय्यक अभियंत्याचा मृत्यूझाला आहे.ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रोड रोलरच्या मागे उभा असलेला सहाय्यक अभियंता त्याच्या मोबाईल फोनवर काहीतरी पाहत होता. यावेळी ही दुर्घटना घडली आहे.