वर्धा: गरिबीमुळे विद्यार्थी इकडे येतात, त्यांच्या आरोग्याशी खेळ नको!' - खासदार अमर काळेंचा JNV सेलूकाटेला इशारा
Wardha, Wardha | Sep 26, 2025 वर्धा शहरालगत असलेल्या सेलूकाटे येथील जवाहर नवोदय विद्यालय काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणामुळे चर्चेत आले होते आज २६सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार खासदार अमर काळे यांनी नवोदय विद्यालयाला भेट देऊन तेथील परिस्थितीचा बारकाईने आढावा घेतला भेटीदरम्यान खासदार काळेंनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य, त्यांच्या शैक्षणिक अडचणी आणि एकूणच शाळेतील व्यवस्थापनाबद्दल थेट त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत.