भुसावळ: हद्दपार आदेशाचा भंग; आरोपी वरणगाव पोलिसांच्या ताब्यात
जळगाव जिल्ह्यातून हदपार करण्यात आलेल्या आरोपीने प्रशासनाच्या आदेशाचा भंग करून जिल्ह्याच्या हद्दीत बेकायदेशीर प्रवेश केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. १६ रोजी वरणगाव पोलिस स्टेशनतर्फे देण्यात आली.