वाशिम: शाळेतून टीसी काढून आणण्याकरीता गेलेली नायनी येथील युवती बेपत्ता! वडिलाची पोलीस स्टेशनला तक्रार
Washim, Washim | Sep 22, 2025 मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या नायनी येथील 21 वर्षीय युवती शाळेतून टीसी काढून आणतो असे घरी सांगून गेली. परंतू घरी परत आलीच नाही. वडिलांनी नातेवाईक यांच्याकडे मुलीचा शोध घेतला असता मिळून आली नाही, त्यामुळे मुलीच्या वडिलाने पोलीस स्टेशनला हरवलेली मुलीचा शोध घेण्या संदर्भात तक्रार दिल्याच्या माहिती दि. 22 सप्टेंबर रोजी पोलिसांच्यावतीने देण्यात आली. पोलिसांनी मिसिंग ची तक्रार दाखल केली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक महाजन हे करीत आहे.