पनवेल: जुईनगर येथे महिलेचा मोबाईल केला लंपास, नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Panvel, Raigad | Apr 7, 2024 जुईनगर सेक्टर २३ येथे भाजी खरेदी करताना ७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा. सुहासिनी पवार या महिलेचा मोबाईल लंपास करण्यात आला. जवळपास ६० हजार रूपये किमतीचा मोबाईल होता. या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.