देवणी: गुरदाळ येथील तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जिल्हा परिषद जवळगाची दमदार कामगिरी.. तीन संघाची जिल्हास्तरीय निवड
Deoni, Latur | Oct 4, 2025 *जि प प्रशाला जवळगा शाळेचे देवणी तालुका स्तरीय खो- खो स्पर्धेत वर्चस्व !* आज नृसिंह विद्यालय गुरदाळ येथे झालेल्या देवणी तालुकास्तरीय खो खो स्पर्धा पार पडल्या. *या स्पर्धेमध्ये 17 वर्षे वयोगट मुली प्रथम , 14 वर्षे वयोगट मुले व मुले प्रथम. या तिन्ही संघाची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे . या सर्व यशस्वी खेळाडूंचे व गावचे सरपंच विजयकुमार पाटील, माजी जि प सदस्य प्रशांत पाटील, माजी सरपंच हनुमंत बिराजदार, आदींनी अभिनंदन केले आहे