आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात येणारे भाविक, साधू, संत, महंत, पर्यटक व प्रशासकीय यंत्रणा यांना वापरासाठी एकात्मिक मोबाईल ॲप व वेब पोर्टल तयार करण्यात येत आहे. यात आवश्यक सर्व सेवा सुविधा अंतर्भूत करून ॲपला अंतिम स्वरूप देण्यासाठी यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहत आयोजित ब्रेनस्टॉर्मिंग सत्रात ते बोलत होते. यावेळी कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, आदी होते.