सेलू: महाबळा येथून विवाहित महिला बेपत्ता; सेलू पोलिसांत मिसिंगची नोंद
Seloo, Wardha | Sep 27, 2025 मामाकडे जातो असे सांगून घरून गेलेली महिला घरी परतलीच नाही. ही घटना आज ता. 27 शनिवारी सकाळी 8.30 वाजता महाबळा येथे घडली. सौ. प्रगती अक्षय बजाईत (वय 25) रा. महाबळा असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय नारायणराव बजाईत रा. महाबळा यांच्या फिर्यादीवरून दुपारी 4.15 वाजता पोलिसांनी मिसिंगची नोंद घेतली आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.