विक्रमगड: तरुणावर नालासोपारा येथे झालेल्या चाकू हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद; आरोपी अटकेत
एका तरुणावर नालासोपारा येथे स्कुटीवर आलेल्या तिघांनी चाकूने हल्ला केला व त्याला जखमी केले. जखमी तरुणाकडील मोबाईल आणि रोख रक्कम चोरून आरोपी पसर झाले. याप्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. तरुणावर झालेल्या चाकू हल्ल्याची ही घटना परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.