दारव्हा: गाजीपूर येथील शेतकऱ्याची अडीच एकरातील केळीबाग उद्ध्वस्त; तीन लाखांचे नुकसान
दारव्हा तालुक्यातील गाजीपूर येथील प्रसिद्ध ‘उद्यान पंडित’ पुरस्कार प्राप्त शेतकरी जगदीश चव्हाण यांच्या शेतातील केळीची बाग १८ मे रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता आलेल्या चक्रीवादळामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. अडीच एकर क्षेत्रात त्यांनी मेहनतीने उभी केलेली केळीबाग काही क्षणात जमीनदोस्त झाली असून त्यात अंदाजे तीन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.