पुसद: आसोली येथील गोरक्षण ट्रस्टला चुकीने दात्यांमार्फत 20लाख रुपये आलेले केले परत
पुसद तालुक्यातील आसोली येथील गोपाल कृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत गोमातेचे संगोपन केले जाते. या गोरक्षण ट्रस्टला विविध दातेमार्फत वेळोवेळी मदत केली जाते. परंतु दिनांक 26 सप्टेंबर रोजी अंदाजे दुपारी 12 वाजताच्या सुमारास मुंबई येथील एका दात्याकडून चुकीने वीस लाख रुपये आले. परंतु गोशाळेचे अध्यक्ष पांडे यांना सदर माहिती कळताच त्यांनी तात्काळ सदर रक्कम परत करून प्रमाणिकपणेचा संदेश दिला.