जामखेड: जामखेडच्या कलाकेंद्रात तोडफोड करणारे ७ आरोपी पकडले... ११ जण फरार... गावठी कट्टा हस्तगत....!
जामखेड येथे कला केंद्राची तोडफोड करून दहशत करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलं असून एक अग्निशस्त्र आणि तीन जीवंत काडतूसे ताब्यात घेण्यात आली. यामध्ये एकूण सात आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून अन्य आरोपी फरार झाले. पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी ही कारवाई केली आहे. सदर गुन्हयातील प्रमुख आरोपीचे नाव अक्षय बोरूडे असल्याचे समजत आहे. त्याच्या जबाबावरून पुढील आरोपींचा तपास सुरू आहे.