कळमनूरी: आखाडा बाळापूर शिवारात उड्डाण पुलाजवळ सफरचंद घेऊन जाणारा आयशर ट्रक उलटला
आयशर ट्रक क्रमांक आर जे 17 जीबी 1399 चा चालक राजेश रा. मेघवाल जि .जिलावाड राजस्थान हा श्रीनगर ते विजयवाडा आयशर ट्रक घेऊन जात असताना आ .बाळापुर शिवारात उड्डाणपूला जवळ आल्यानंतर ट्रक चालकास झोपेची डूलकी लागल्याने वाहन डिव्हायडरला धडकून पलटी झाले आहे . यामधील सफरचंद रस्त्यावर अस्ताव्यस्त पडून मोठे नुकसान झाले,महामार्गाच्या पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली असल्याची माहिती आज दिनांक 6 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाली आहे .