बालदिनाच्या निमित्ताने रायगड जिल्हा पोलिसांनी आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती व उन्नतीसाठी महत्त्वाकांक्षी ‘प्रेरणा’ उपक्रमाची सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हा उपक्रम राबवण्याचा मानस असून, त्याची सुरुवात सुधागड तालुक्यातील वावळोली येथील आदिवासी आश्रमशाळेत पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी बालदिनाचे औचित्य साधत पोलिस अधीक्षक आँचल जलाल यांनी विद्यार्थ्यांसोबत केक कापून आनंद साजरा केला.