धरणगाव: खोटे लग्न लावून धरणगावातील तरूणीवर अत्याचार; धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल
धरणगाव शहरातील एका भागात राहणारी २९ वर्षीय तरूणीला लग्नाचे लावण्याचे खोटे आमिष दाखवत गेल्या तीन वर्षांपासून अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत तरूणीने मुलाला जन्म दिल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी २६ मे रोजी दुपारी अडीच वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.