रावणवाडी शहरातील बनाथर कॉलनीत अवैध मद्य विक्रीच्या प्रकरणी पोलीसांनी १६ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार भुवनलाल देशमुख यांनी रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बनाथर येथील प्रणोता राजेशकुमार वडते (४७) यांच्या घरून ५ लिटर दारू जप्त केली आहे. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.