साकोली: साकोलीच्या बाजारात दिवाळीची धामधूम,खरेदीसाठी नागरिकांची झुंबड, कोट्यावधींची उलाढाल
दिवाळीच्या निमित्ताने सोमवार दि. 20 ऑक्टोबरला सकाळी आठ वाजल्यापासून तर रात्रीपर्यंत साकोली शहरांमध्ये कपड्यांसह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी झालेल्या गर्दीने बाजारपेठ हाऊसफुल झाली आहे.बाजारपेठांमध्ये रेडिमेड कपडे,फटाके,रेडिमेड फराळ,विद्युत रोषणाईसाठी आवश्यक उपकरणे व इतरही खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली आहे सोने चांदी तसेच वाहन खरेदीसाठीही गर्दी दिसली बाजारपेठेत कोट्यावधींची उलाढाल झाली आहे