कळमनूरी: आईसह पाच वर्षाच्या मुलाचा मृतदेह तलावात आढळला, खरवड शिवारातील घटना
कळमनुरी तालुक्यातील खरवड शिवारात पाच वर्षाच्या मुलासह आईचा मृतदेह आज दिनांक 6 नोवेंबर ची सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास येथील जवळच असलेल्या तलावामध्ये आढळून आला आहे .मयत महिलेचे नाव ज्योती सागर सावळे वय 30 वर्ष,राज सावळे वय पाच वर्षे असे असून त्या दीपावलीनिमित्त खरवड या ठिकाणी आल्या होत्या,मागील चार दिवसापासून घराबाहेर पडून बेपत्ता झाल्या होत्या,त्यानंतर आज सकाळी त्यांचा मृतदेह तलावात आढळून आला आहे.