दारव्हा: शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त, उपाययोजना करण्यासाठी अधीक्षकांना निवेदन
दारव्हा उपजिल्हा रुग्णालयातील असुविधा व अस्वच्छतेमुळे नागरिक सध्या त्रस्त असून त्वरित उपाययोजना करण्यात यावी यासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल राठोड यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक यांना दिनांक पाच जूनला दुपारी चार वाजता दरम्यान निवेदन देऊन मागणी केली आहे.