वैजापूर: महालगाव शिवारात पंचगंगा साखर कारखान्याजवळ अपघातात दोघांचा मृत्यू
रस्त्यावर उभ्या नादुरुस्त ट्रकला धडकून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गंगापूर महामार्गावर महालगाव शिवारात पंचगंगा साखर कारखान्याजवळ घडली. सूरज संजय गायकवाड वय २३ वर्षे व सुमित विलास धोत्रे वय २० वर्षे राहणार श्रीरामपूर अशी घटनेतील मयत मुलांची नावे आहे.या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सूरज व सुमित हे दोघे श्रीरामपूरकडे जात असताना महालगाव शिवारात उभ्या नादुरुस्त ट्रकला त्यांची दुचाकी पाठीमागून धडकली.