उत्तर सोलापूर: शहरातील २८९ धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले : पोलीस आयुक्त एम. राजकुमार...
सोलापूर शहरातील ध्वनीप्रदूषण नियंत्रणाच्या आदेशानुसार एकूण २८९ धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सोमवारी दुपारी दोन वाजता पत्रकारांशी बोलताना दिली आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार व मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली. शहरातील विविध भागातील मंदिरे, मशिदी, दर्गे आणि इतर धार्मिक स्थळांवरील भोंगे तपासण्यात आले. परवानगीशिवाय बसवलेले भोंगे तत्काळ काढून टाकण्यात आले, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.