*‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’द्वारे मिळणार नागरिकांना माहिती आणि सेवा: जिल्हाधिकारी दिलीप स्वामी* छत्रपती संभाजीनगर:सेवा हमी कायदा २०१५ च्या अंमलबजावणीत जिल्हा प्रशासनाने आणखीन एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. आता नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा व सेवांसंबंधित माहिती ही व्हॉट्सॲप चॅटबॉट द्वारे उपलब्ध होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे