आमगाव तालुक्यातील सितेपार येथील नवातलावजवळील पहाडी परिसरात ४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२:५० वाजताच्या सुमारास अवैधरित्या गौणखनिज उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. आमगाव पोलिसांनी कारवाई करीत जेसीबी मशीनसह पाच ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केल्या असून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार रामचंद चौधरी (ब.क्र. १६०६) यांनी दिले