भिवंडी: येत्या काही दिवसात बदलापूरकरांचा त्रास बंद होणार, भिवंडी लोकसभेचे माजी खासदार कपिल पाटील
Bhiwandi, Thane | Oct 18, 2025 बदलापूर येथे लोकल सेवा उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज भिवंडी लोकसभेचे माजी खासदार कपिल पाटील यांनी मध्य रेल्वेचे डीआरएम यांना फोन केला होता. त्यानंतर आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 2च्या सुमारास कपिल पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधत माहिती दिली आहे. येत्या काही दिवसात बदलापूरकरांचा त्रास बंद होणार आहे असं त्यांनी सांगितलं.