शिरपूर: तालुक्यातील भोरटेक येथे
रस्त्याच्या कामात लाखो रुपयांचा अपहार;तत्कालीन सरपंच, ग्रामरोजगार सेवकावर थाळनेर पोलिसात गुन्हा
Shirpur, Dhule | Oct 12, 2025 महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामात तालुक्यातील भोरटेक ग्रा.पं.मध्ये अनियमितता आणि लाखो रुपयांच्या गैरव्यवहार झाल्याच्या संशयावरून थाळनेर पोलीस ठाण्यात तत्कालिन सरपंच आणि ग्रामरोजगार सेवकावर 10 ऑक्टो.गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सदर गुन्ह्याचे तापासाधिकारी व थाळनेर पोलीस ठाण्याचे पीएसआय समाधान भाटेवाल यांनी 12 ऑक्टो. रोजी दुपारी माहिती दिली आहे.याप्रकरणी शिरपूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजय पवार यांनी तक्रार दाखल केली आहे.