उदगीर: उपमुख्यमंत्री अजित पवार आज उदगीर दौऱ्यावर, स्वागतासाठी सजली उदगीर नगरी
Udgir, Latur | Oct 30, 2025 उदगीर शहरात उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व विविध मान्यवरांच्या हस्ते ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी पार पडणार आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी उदगीर नगरी सजली असून प्रशासन सज्ज आहे,अजित पवार यांच्या दौऱ्या निमित उदगीर शहरातून होणारी वाहतूक रिंग रोड मार्गे वळविण्यात आली आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध विकास कामाचेही उद्घाटन पार पडणार आहेत,